नाशिक :- शहरामधील नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या सिडको उपविभागातील ११ केव्ही पवन नगर विद्युत वाहिनीवर तातडीचे देखभाल दुरुस्तीचे विविध काम करण्यात येणार असल्याने, शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत या वाहिनीवरील भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
यामध्ये महाकाली चौक, अक्षय चौक, सप्तशृंगी चौक, गणपती मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, पवन नगर भाजी मार्केट, लोकमान्य नगर, आदर्श नगर, पवन नगर, रायगड चौक, सावता नगर, अहिल्यादेवी होळकर पुतळा, आर्मी क्वार्टर, कॅप्टन कॉर्नर, पवन नगर अभ्यासिका, सूर्योदय कॉलनी, दिव्या ऍड लॅब व परिसर याचा समावेश असेल.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वा वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.