धक्कादायक !  सार्वजनिक शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अन्...
धक्कादायक ! सार्वजनिक शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अन्...
img
Nandini khandare More
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून एलवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना देखील दिवसागणिक वाढतच  चालल्या आहेत. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. 

पनवेलमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. शहरातील वाल्मिकी नगर परिसरात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिकी नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. मुलीने सांगितलेली आपबिती ऐकून कुटुंबीयांचा संताप झाला. कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला अटक करण्यासाठी आणि घटनेशी संबंधित सर्व पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता, विशेषतः शौचालये, मोकळे परिसर आणि कमी वर्दळीची ठिकाणे याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. वाल्मिकी नगर परिसरातील रहिवाशांनी संवेदनशील भागांमध्ये नियमित पोलीस गस्त वाढवावी, अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group