राज्यासह आता देशातभरातील राजकारणाच्या घडामोडींना वेग आला असून अनेक हालचाली सुरु आहेत. दरम्यान आता भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
नीट परीक्षेवरून गदारोळ निर्माण झाल्या नंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहजाद पुनावाला यांनी पदाचा राजीनामा दिला. यांनतर आता राजीनाम्यांचे सत्र सुरु झाले असून भाजपला मोठे धक्के बसत आहेत.
पुनावाला यांच्यानंतर बिहारमध्ये बड्या नेत्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. देवेश कुमार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेश कुमार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजनामा सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सोपवला आहे. परंतु देवेंश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वाधिक चर्चा मंत्री दीपक प्रकाश यांची होऊ लागली आहे.
दीपक प्रकाश यांच्या मंत्रिपदावरील नियुक्तीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. त्यानंतर भाजप देखील सक्रिय झालं. त्यामुळे देवेश कुमार यांचा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा महत्त्वाचा मानला गेला. देवेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे दीपक प्रकाश यांच्या विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच त्यांच्या मंत्रिपदालाही संरक्षण प्राप्त झालं.
देवेश कुमार यांनी आज शुक्रवारी राजीनामा दिला. विधानपरिषदेत आज भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सवारगी आणि इतर नेते पोहोचले. त्यांच्यासोबत विधान परिषद सभापती अवधेश नारायण सिंह देखील होते. तर देवेश कुमार विधानपरिषदेच्या मागच्या दालनातून आले. देवेश कुमार यांनी विधान परिषद सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे राजीनामा दिला. यावेळी भाजपचे इतर नेते देखील होते. देवेश कुमार हे राजीनामा देऊन सभागृहातून निघून गेले. देवेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजप नेते संजय सरावगी यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. देवेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे दीपक प्रकाश यांचा विधानपरिषदेवर निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दीपक प्रकाश हे विधान परिषद सदस्य झाले. तर दीपक प्रकाश यांच्या मंत्रिपदाला घटनात्मक संरक्षण मिळेल. देवेश कुमार यांचा राजीनामा फक्त विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी नाही. तर दीपक प्रकाश यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.