''या'' कारणावरून CJP रडारवर ! सरकारचे मोठे पाऊल, मंत्र्यांनी थेट…
''या'' कारणावरून CJP रडारवर ! सरकारचे मोठे पाऊल, मंत्र्यांनी थेट…
img
Nandini khandare More

नीट परीक्षेवरून कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक पवित्र घेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारलं. याचा परिणाम म्हणजे धर्मेंद्र प्रधान  यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा आला आहे. यावरून देखील मोठा गदारोळ निर्माण झाला परंतु  CJP ला सर्वच स्तरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. याच सर्व घडामोडी दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 

नीट पेपरफुटी आणि तत्त्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने एल्गार पुकारला होता. त्यांच्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या. इतर काही मागण्यांविषयी सरकारने आश्वासन दिले आहे. आता सीजेपी सरकारच्या रडारवर आली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयीचे मोठे संकेत दिले आहेत. यापूर्वी सुद्धा भाजप आणि एनडीएच्या गोटातून सीजेपीवर हल्ले सुरूच होते. आता सरकारने सीजेपीला परदेशातून निधी मिळत आहे की नाही याची चौकशी करण्याचे निश्चित केले आहे.

CJP च्या फॉरेन फंडिंगची चौकशी

सीजेपी पक्षाला विदेशातून, परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. आता सीजेपीला फॉरेन फंडिंग करण्यात आली की नाही याची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. महाराष्ट्रात गृह विभागाने आणि केंद्रात ईडीकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती भोयर यांनी दिली आहे. सीजेपीसह इतर फॉरेन फंडिंग घेणाऱ्या संस्थांची चौकशी सुरू असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.

या संस्था फॉरेन फंडिंगचा वापर सकारात्मक कामासाठी वापरत असतील तर हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण देश, राज्य अथवा समाज अस्थिर करण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत असेल, संस्था, संघटना जर त्यासाठी त्याचा वापर करत असतील. तर निश्चितपणे त्याची चौकशी करण्यात येईल, असे भोयर यांनी सांगितले. यामुळे सीजेपी ही आता केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचे मानले जात आहे.

संशय असेल तर चौकशी करा

यापूर्वी अभिजीत दिपके यांनी फॉरेन फंडिंगच्या आरोपावर टीकाकारांना थेट उत्तर दिले होते. सरकारला जर संशय असेल तर त्यांनी चौकशी करावी असे दिपके म्हणाले होते. आता या चौकशीतून काय बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर विरोधकांनी हा सीजेपीला बदनाम करण्याचा आणि आंदोलकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group