देशात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून नीट परीक्षा घोटाळ्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस उपोषण केलं. वांगचुक यांचं जंतरमंतरवरचं आंदोलन मोडीत काढल्यानंतर त्यांना आधी सफदरजंग आणि नंतर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदातामध्ये वांगचुक यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. दरम्यान मध्य रात्री सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडलं आहे.
त्यामुळे सीजेपी आंदोलन मागे घेणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, वांगचुक यांनी रात्री अचानक उपोषण सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मध्यरात्री असं काय घडलं? पडद्यामागे सरकारच्या काय हालचाली सुरू होत्या? वांगचुक उपोषण मागे घेणार हे आंदोलकांना माहीत होतं का? मध्यरात्री शेवटच्या 88 मिनिटात नेमकं काय घडलं? काय आहे या मागची इन्साइड स्टोरी? याचाच घेतलेला हा आढावा.
सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस उपोषण केलं. वांगचुक यांचं जंतरमंतरवरचं आंदोलन मोडीत काढल्यानंतर त्यांना आधी सफदरजंग आणि नंतर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदातामध्ये वांगचुक यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. मात्र रात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी उपोषण सोडलं. तशी पोस्टच त्यांनी सोशल मीडियावर केली. त्यांनी आधी ट्विटरवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सकाळी युट्यूबवर 11 मिनिट 30 सेकंदाचा व्हिडिओ टाकून उपोषण सोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली.
सोनम वांगचुक यांनी उपोषण समाप्त करण्याची घोषणा केली. त्याचं जंतरमंतरवर बसलेल्या आंदोलकांनी स्वागत गेलं आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर आंदोलकांनी नाचत गात जल्लोष केला. तसे व्हिडिओही समोर आले आहेत. आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनीही वांगचुक यांनी उपोषण सोडल्याने त्याचं स्वागत गेलं आहे. आम्ही वांगचुक यांचे आभारी आहोत. पण जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील. आम्ही जंतरमंतर सोडणार नाही, असं दीपके यांनी म्हटलं आहे.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात रात्री एक उच्चस्तरीय बैठक झाली. ही बैठक तब्बल चार तास चालली. यावेळी वांगचुक यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचा निरअमय घेण्यात आला. पण वांगचुक यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
अमित शाह यांच्या सूचनेनंतर डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना फोन केला. वांगचुक यांनी जे मुद्दे उचलले आहेत. त्याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत, असा विश्वास त्यांनी गीतांजली यांना दिला. तसेच वांगचुक यांनी आता उपोषण सोडावं, असा आग्रहीही धरला.