आम्हाला आज अटक....अभिजीत दीपकेंचा खळबळजनक दावा; नेमकं काय आणि का म्हणाले ?
आम्हाला आज अटक....अभिजीत दीपकेंचा खळबळजनक दावा; नेमकं काय आणि का म्हणाले ?
img
Nandini khandare More
सध्या  देशात नीट परीक्षेवरून मोठा गदारोळ सुरु असून नीट परीक्षा घोटाळा प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणी साठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शुक्रवारी महत्वपूर्ण वळण आले आहे. २८ जूनपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले. 

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण मध्यरात्री सरकारचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. तर दुसरीकडे अभिजीत दीपकेंचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. अशात त्यांनी मोठा दावा केला. आम्हाला आज अटक केली जाईल अशी माहिती मला मिळाली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group