सोनम वांगचुक यांच्या उपचारांबाबत कोर्टाने दिला ''हा'' महत्वाचा निर्णय !
सोनम वांगचुक यांच्या उपचारांबाबत कोर्टाने दिला ''हा'' महत्वाचा निर्णय !
img
Nandini khandare More

कॉक्रोच जनता पक्षाच्या समर्थनात सोनम वांगचुक हे 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले होते. दरम्यान शनिवारी दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून हटवून  सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून हलविण्याबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. 

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सोनम यांना सरकारी रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांची खास टीमही तयार करण्यात येणार आहे. त्या टीमकडून मेडिकल रिपोर्ट देखील घेतले जाणार आहेत.

सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून हलविण्याबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी हायकोर्टात सोनम वांगचुक यांचं नवीन आरोग्याचा अहवाल सादर केला. सरकारी वकिलांनी म्हटलं की, आम्हाला सोनम यांना मेदांता रुग्णालयात दाखल करणयावर कोणताही आक्षेप नाही. सफदरजंग रुग्णालयात आतापर्यंत करण्यात आलेले उपचार, रिपोर्ट, इतर कागदपत्रे देखील मेदांता रुग्णालयाला उपलब्ध केले जातील. परंतु डिस्चार्ज हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होईल.

हायकोर्टचे न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश तेजस कारिया यांच्या खंडपीठाने हा महत्वाचा निर्णय घेतला. दिल्ली हायकोर्टात सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने निर्णय घेतला. सरकारी वकिलांनी सांगितलं की, ‘सोनम वांगचुक यांच्यासोबत असणार्‍यांना त्यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढायचं आहे. परंतु सोनम वांगचुक हे त्यांच्या पसंतीचं रुग्णालय आणि डॉक्टर निवडू शकतात. परंतु डिस्चार्ज हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देण्यात यावा. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल केले पाहिजे. परंतु सोनम हे रुग्णालयातून जंतर-मंतरवर गेले. तिकडे जाऊन उपोषणाला काही झालं, तर त्याला कोण जबाबदार राहील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारी वकिलांनी पुढे सांगितलं की, ‘केंद्र सरकार सोनम वांगचुक यांच्या आरोग्याबाबत कोणतीही जोखीम घेऊ शकत नाही. त्यांची तब्येतीवर परिणाम झाल्यास त्याचा परिणाम थेट सरकारवर होईल’. त्यानंतर कोर्टाने म्हटलं की, ‘मेडिकल रिपोर्टनुसार, सोनम वांगचुक यांच्या आरोग्याावर देखरेख ठेवण्याची गरज आहे.सफदरजंग रुग्णालय आणि मेदांता रुग्णालयातही त्यांच्या आरोग्यावर देखरेख केली जाऊ शकते. त्यांच्यावर दोन्ही ठिकाणी उपचार झाले, तर डॉक्टरांनी त्यांच्यावर देखरेख ठेवली गेली, तर त्यांना मेदांता रुग्णालयात हलविता येईल’.

इतर बातम्या
Join Whatsapp Group