मोठी बातमी ! NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधानांचं  सर्वात मोठं विधान ; दोषींवर कारवाई..
मोठी बातमी ! NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधानांचं सर्वात मोठं विधान ; दोषींवर कारवाई..
img
Nandini khandare More
सध्या देशभरात NEET परीक्षा घोटाळा प्रकरणाने मोठी खळबळ निर्माण झाली असून आता या प्रकरणावरून  संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी दिल्लीतील जंतरमंतरवर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे देशभरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांकडून न्यायाची मागणी केली जात आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे.

या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी दिले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर सरकार कोणतीही गय करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जंतरमंतरवरील वाढत्या विरोधानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता या प्रकरणातील दोषींवर नेमकी काय कारवाई होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्याआधी सकाळी एनडीए खासदारांची 'मंगल मिलन' बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान मोदींनीही या बैठकीत पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले की, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटीसाठी दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. महाराष्ट्रातील मंदिरातही घोटाळा, ६० कोटींचा गैरव्यवहार उघड, महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, पेपरफुटी रोखणे ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही, तर सर्व राज्य सरकारांना आणि पक्षांना एकत्र येऊन यासाठी लढा द्यावा लागेल. 

दरम्यान, सोमवारी पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी हजारो आंदोलकांनी जंतरमंतर दे संसद अशी निदर्शने केली होती. पेपरफुटीची बातमी समोर येताच सरकारने तात्काळ कारवाई केली आणि १३ जणांना अटक करून तुरुंगात पाठवले. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी नीटच्या फेरपरीक्षेला प्राधान्य देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाल्याचे रिजिजू यांनी सांगितले. नीट परीक्षेसंदर्भात पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे की, पेपरफुटीची बातमी समोर येताच सरकारने तात्काळ कारवाई केली आणि १३ जणांना तुरुंगात टाकले. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी नीटच्या फेरपरीक्षेला प्राधान्य देण्यात आले, असेही ते म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group