संतापजनक ! क्लास चालकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कुठे घडली घटना ?
संतापजनक ! क्लास चालकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More

राज्यात स्त्री असुरक्षित असून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान आता पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. कात्रजमध्ये एका १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. क्लास चालकानेच मुलीला नको नको तिथे स्पर्श करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून शिक्षकी पेशाला काळीमा फासला. पुण्यातील आंबेगाव पठार पोलीस स्थानकाच्या हद्दीतील घटना आहे.आरिफ सय्यद असे क्लास चालकाचे नाव असून, संबंधित क्लास चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. खासगी क्लास चालकाविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अर्थात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

१४ वर्षांची मुलगी नियमित शिकवणीसाठी कात्रजच्या एका शिक्षकाकडे जात होती. मुलीसोबत चांगली ओळख असल्याने शिक्षकाने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.

या घटनेची आपबीती स्वतः पीडितेने सांगितली आहे. 

मागील काही महिन्यांपासुन क्लासचे वेळी सर माऊस, की बोर्ड वापरताना मला स्पर्श करीत होते. परंतु ते मला लहानपणापासून शिकवत असल्याने सदर स्पर्श हे चुकून होत असतील अशी मी मनाची समजूत काढली. अंदाजे ३ ते ४ आठवड्यापूर्वी सरांच्या घरी ऑनलाईन मदरसा क्लास घेण्याकरीला गेले होते. त्यावेळी अंदाजे साडे दवा वाजताच्या सुमारास मदरसा ऑनलाईन क्लास संपल्याने खूप रात्र झाली आहे. तू इथेच झोप. उद्या सकाळी घरी सोडतो. असे मला म्हटले, त्याबाबत मी सरांच्या मोबाईल नंबर वरून माझे वडिलांना फोन करून मी उशिर झाल्याने सरांकडे राहत आहे. असे कळविले. सरांकडे बहुतेक वेळा त्यांना मदत करणारे त्यांचे विद्यार्थी राहतात हे मला माहित आहे. त्यामुळे मला आणि माझ्या वडिलांना त्यात काही गैर वाटले नाही. तसेच त्यावेळी त्यांची मुलगी घरी असल्याने मी सरांच्या घरी मुक्काम केला. तेव्हा तेथे त्यांच्या मुलीची मैत्रीण, तिचा भाऊ देखील राहण्यास होते. 

सरांचे घर 1 बीएचके असून बेडरूममध्ये सामान असल्याने आम्ही सर्वजण रात्री हॉलमध्ये झोपलो होतो. भिंतीला लागून मी झोपले होते. माझ्या बाजूला सरांची मुलगी, नंतर तिची मैत्रीण, नंतर सरांचा मुलगा आणि सर असे झोपलो होतो. मला झोप लागल्यानंतर मध्यरात्री माझे जवळ कोणीतरी येऊन माझ्या शुचे जागेवर हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला जाणवले, तेव्हा मी या अचानक होणाऱ्याया प्रकारामुळे दचकून जागी झाले. तेव्हा माझे शेजारी सर बसल्याचे दिसले. मी घाबरुन उठले आणि त्यांचेकडे पाहिल्यावर ते तेथून निघून गेले. माझी छाती धडधडायला लागली, मला खूप रडू येऊ लागले. परंतु सगळेजण झोपले असल्याने मी रात्रभर तशीच बसून काढली, असे पीडित अल्पवयीन मुलीने सांगितले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group