हॉटेल रूम बुकिंग करताना आधारकार्डऐवजी आता ‘हे’ करा; जाणून घ्या नवी पद्धत
हॉटेल रूम बुकिंग करताना आधारकार्डऐवजी आता ‘हे’ करा; जाणून घ्या नवी पद्धत
img
Nandini khandare More

अनेकदा बाहेरगावी गेल्यावर राहण्याकरता हॉटेल बुकिंग करावी लागते ही बुकिंग  करण्यासाठी आधारकार्डची कॉपी द्यावी लागत. दरम्यान, आता
हॉटेलमध्ये चेक-इनसाठी आधारकार्डची कॉपी देण्याची गरज आता कमी होऊ शकते. मात्र, आता या प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हॉटेल चेक-इन प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने काम सुरू आहे.

नव्या नियमांनुसार, ओळख पडताळणीसाठी QR कोड, OTP आणि अॅपच्या माध्यमातून डिजिटल व्हेरिफिकेशन यांसारखे पर्याय वापरले जाऊ शकतात. त्यामुळे भविष्यात हॉटेलमध्ये रूम बुक करताना किंवा चेक-इन करताना प्रत्येक वेळी आधार कार्डची फिजिकल कॉपी जमा करण्याची गरज नाही.

नव्या पद्धतीमध्ये ग्राहकाच्या आधार अॅपमध्ये उपलब्ध असलेला QR कोड स्कॅन करून ओळख पडताळली जाऊ शकते. यामुळे कागदपत्राची प्रत हॉटेलकडे जमा करण्याऐवजी डिजिटल पद्धतीने ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. QR कोडसोबत OTP आधारित पडताळणीचाही पर्याय असू शकतो. ग्राहकाच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आता OTP पाठवून त्याची ओळख निश्चित केली जाऊ शकते. ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि इतर ऑनलाइन सेवांमध्ये ज्या पद्धतीने OTPचा वापर केला जातो, त्याच त्याच प्रकारे ही प्रोसेस असण्याची शक्यता आहे.

आधारची फोटोकॉपी जमा करण्याबाबत सर्वात मोठी चिंता वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेची असते. आधारवर नाव, पत्ता आणि इतर संवेदनशील ओळखविषयक माहिती असते. ही प्रत दीर्घकाळ एखाद्या संस्थेकडे राहिल्यास डेटा प्रायव्हसीबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. चेक-इन अधिक वेगवान होण्यासोबतच ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेलाही मदत होऊ शकते. मात्र, या नव्या पद्धतीची अंमलबजावणी नेमकी कशी आणि कधी होईल, याबाबत अधिकृत नियम स्पष्ट झाल्यानंतरच अंतिम चित्र समोर येईल. त्यामुळे सध्या प्रवास करताना हॉटेलच्या ओळखपत्रासंबंधीच्या आवश्यकतांची आधी खात्री करणे योग्य ठरेल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group