आमदाराच्या मुलीची दादागिरी ! थेट महिला PSI च्या कानशिलात लगावली; नेमकं काय घडल ?
आमदाराच्या मुलीची दादागिरी ! थेट महिला PSI च्या कानशिलात लगावली; नेमकं काय घडल ?
img
Nandini khandare More
कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना मारहाण केली असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत . दरम्यान आता अशीच एक घटना आता समोर आली आहे. आता चक्क एका आमदाराच्या मुलीची दादागिरी समोर आली आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाण्यावरून झालेल्या वादातून भाजप आमदाराच्या मुलीने थेटPSI च्या कानशिलात लगावली असल्याची घटना घडली आहे. हा प्रकार कर्नाटकातील श्रीरंगपट्टण येथील आरती अक्कडा मंदिरात घडला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. 

मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये आमदाराची मुलगी महिला पोलिसासोबत वाद घालताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील उक्कड मंदिरात १२ ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला. भीम अमावस्येच्या उत्सवादरम्यान स्थानिक आमदार सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या गौडा दर्शनासाठी मंदिरात आली होती. यावेळी तिला गर्भगृहात जाण्यापासून पोलिसांनी रोखले. यावरून तिचा महिला PSI सविता पाटील यांच्यासोबत वाद झाला.

वाद वाढल्यानंतर ऐश्वर्या गौडा हिने थेट महिला पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर सविता पाटील यांनीही ऐश्वर्याला प्रत्युत्तर दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेनंतर PSI सविता पाटील यांनी क्याथनहळ्ळी पोलीस ठाण्यात ऐश्वर्या गौडा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. ऐश्वर्याने शिवीगाळ करत मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, ऐश्वर्या गौडा यांनीही महिला PSI सविता पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या घटनेवर आमदार सुरेश गौडा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी मुलगी दर्शनासाठी मंदिरात गेली होती. तिने गर्भगृहात जाण्याची विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी तिला आत जाण्याची परवानगी दिली नाही. एका सर्कल इन्स्पेक्टरला मात्र आत जाऊ दिल्याने तिने पुन्हा विनंती केली, असे त्यांनी सांगितले. 

 यावेळी महिला पोलिसाने माझ्या मुलीला शिवीगाळ केल्याचे समजते. त्यानंतर दोघींमध्ये वाद आणि मारामारी झाली, असा दावा आमदारांनी केला. माझ्या मुलीने महिला पोलिसाच्या कानशिलात मारल्याचा व्हिडिओ मी अद्याप पाहिलेला नाही. मात्र, या घटनेबद्दल मी माफी मागतो आणि मला याचे वाईट वाटते, असेही सुरेश गौडा यांनी म्हटले. आमदाराच्या मुलीनेच कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसावर हात उचलल्याने या घटनेची चर्चा कर्नाटकात सुरू झाली आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group