शिक्षकाची मुलांसह आत्महत्या ! धावती कार थेट नदीपात्रात; आधी स्टेटस ठेवल...
शिक्षकाची मुलांसह आत्महत्या ! धावती कार थेट नदीपात्रात; आधी स्टेटस ठेवल...
img
Nandini khandare More
 अतिशय दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षकानं आपल्या मुलांसह आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ निर्माण झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार , जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं आपल्या दोन मुलांसह पुलावरून गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या आमदुरा पुलाजवळ आज शुक्रवारी सकाळी ही मन हेलावणारी घटना घडली.

धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी शिक्षकाने व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं. गट शिक्षण अधिकाऱ्यांसह इतर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मुलासह आत्महत्या करीत आहे, असं स्टेट्स ठेवलं. सुमित मोरे, मुलगा आणि मुलगं असं मृत पावलेल्यांची नावे आहेत. शिक्षकानं मुलांसह आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील टेंबर गावचे रहिवासी असून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षकपदी कार्यरत होते. मागील काही वर्षापासून ते पत्नी आणि दोन मुलांसह सांगवी गोपाळनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. आज सकाळी दोन्ही मुलांना कारमध्ये बसून 'शाळेत सोडतो' म्हणून घरून निघाले. सकाळी सात वाजेच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील पुणे गाव परिसरातील आमदुरा घाटावरुन गोदावरी नदीपात्रात गाडी टाकून चिमुकल्यांसह त्यांनी जीवनयात्रा संपवलीयं.
 
अधिकाऱ्यांविरोधात माझ्याकडे अनेक पुरावे
दोन वर्षापासून हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुखाकडून वेगवेगळ्या कारणांवरून चौकशी करण्यात आली, त्यांच्या या जाचाला कंटाळलो असल्याचं शिक्षकाने घटनेपूर्वी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं. स्टेट्समध्ये अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख देखील केला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एसडीआरएफच्या पथकाने कार आणि कारमधील तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

या घटनेनं शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं आपल्या चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे घटनेपूर्वी शिक्षकाने आपल्या एका सहकार्यासोबत फोनवर संभाषण देखील केलं. समोरील व्यक्तीने 'आपण सोबत लढा देऊ, कोणताही निर्णय घेऊ नका', अशी विनवणी केली. 'अधिकाऱ्यांविरोधात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत', असं सुनील मोरेंनी देखील संभाषणात म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group