वारीच्या मार्गावर काळाचा घाला! भरधाव कारच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू
वारीच्या मार्गावर काळाचा घाला! भरधाव कारच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू
img
Nandini khandare More
आषाढी एकादशी निम्मित हजारो वारकरी पायी चालत वारी करत आहेत. अतिशय भक्तिमय आणि चैतन्याच्या या वातावरणात मात्र आता एक विरझन पडले आहे. भरधाव कारच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाली असल्याची दुर्दैवी घटना घडली  आहे. 

पुण्याजवळील जेजुरीत वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसल्याने ३ महिला भाविकांचा मृत्यू झाला होता, या घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेला आठवडाही झाला नाही, त्याआधीच पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा वारीत भयंकर अपघात झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री एका भरधाव वेगात असणाऱ्या कारने वारकऱ्याला चिरडल्याची संतापजनक घटना घडली आहे. या दुर्दैवी अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

विठुरायाच्या गजरात वारकरी पंढरीच्या दिशेने प्रवास करत आहेत. पण मागील चार दिवसात अपघाताच्या ३ घटना झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. मध्यरात्री बारामतीजवळ एका भरधाव वेगात असलेल्या कारने वारकऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात तणावाची परिस्थिती झाली होती.

भरगाव वेगात असणार्‍या एका कारने मध्यरात्री बारामतीत वारकऱ्याला उडवले. या भीषण अपघातात वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विष्णू रामचंद्र पवार असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. ६७ वर्षाचे विष्णू पवार हे विठू माऊलीला भेटण्यासाठी भजनात दंग होऊन निघाले होते. रात्रीच्या वेळी पण भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालक फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.

या दुर्दैवी अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. अपघाताची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी इतर वारकऱ्यांनी जखमी पवार यांना तात्काळ रूग्णवाहिकेतून जवळच्या रूग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बारामती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group