दीड वर्षांच्या चिमुरड्याला  ८ वेळा रस्त्यावर आपटून मारलं !  दोषीला फाशीची शिक्षा
दीड वर्षांच्या चिमुरड्याला ८ वेळा रस्त्यावर आपटून मारलं ! दोषीला फाशीची शिक्षा
img
Nandini khandare More


उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील दीड वर्षाच्या निष्पाप आरवच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. दरम्यान या क्रूर प्रकरणाचा निकाल लागला असून कोर्टाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

एकतर्फी प्रेमात अंध झालेल्या एका नराधमाने ज्या चिमुरड्याला अजून नीट बोलताही येत नव्हते, त्याला आपल्या रागाचा बळी बनवले. या हत्याकांडात जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत दोषी विराज उर्फ जितेंद्र पाठक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अवघ्या ४० दिवसांत न्यायालयाने हा खटला निकाली काढला आहे.

एकतर्फी प्रेम आणि लग्नाला नकार ठरला कारण अरांव परिसरातील रहिवासी असलेल्या रती देवी यांचा विवाह २०२४ मध्ये बदायू येथील सुमित कुमार याच्याशी झाला होता. मात्र, संसारात वाद वाढल्याने रती गेल्या पाच महिन्यांपासून आपल्या दीड वर्षाचा मुलगा आरव याच्यासह माहेरी राहत होती. याच दरम्यान पती सुमितचा नातेवाईक जितेंद्र पाठक हा रती यांच्या संपर्कात आला. सुरुवातीला मदतीचा आणि आधाराचा बहाणा करत त्याने रतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांतच जितेंद्रने रतीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, रतीने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. पोलिसांच्या तपासानुसार, जितेंद्रला हा नकार पचवता आला नाही. तो सतत रतीवर लग्नासाठी दबाव टाकत होता, पण प्रत्येक वेळी अपयश आल्याने त्याचा राग अनावर झाला. 


नाक्कीमकाय घडलं होत ? 

 ३० मे रोजी रती देवी एका कायदेशीर कामासाठी आपल्या आईसोबत शिकोहाबाद येथे आल्या होत्या. याच वेळी जितेंद्रही तिथे पोहोचला. त्याने दीड वर्षाच्या आरवला टॉफी देण्याचे आमिष दाखवले आणि त्याला आपल्यासोबत घेऊन गेला. काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी नेऊन जितेंद्रने जी क्रूरता केली, तिची कल्पनाही करवत नाही. त्याने अवघ्या २७ सेकंदांच्या आत आरवला रस्त्यावर एकापाठोपाठ एक तब्बल ८ वेळा जोरात आपटले. गंभीर दुखापतींमुळे चिमुरड्या आरवचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तो आरवचा मृतदेह रतीच्या घराबाहेर टाकून फरार झाला. या संपूर्ण घटनेचे काळजाचा थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास केला. केवळ ६ दिवसांच्या आत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील राजीव प्रियदर्शी यांनी न्यायालयात बाजू मांडताना भक्कम पुरावे सादर केले. फिर्यादी पक्षाकडून १३ साक्षीदार तपासण्यात आले, तर बचाव पक्षाकडून एक साक्षीदार उभा राहिला. न्यायालयातच स्वतःला मारू लागला थपडा! शिकोहाबादच्या यादव कॉलनीत घडलेल्या या घटनेनंतर न्यायालयाने अवघ्या ४० दिवसांत सुनावणी पूर्ण केली. गुरुवारी जितेंद्र पाठकला दोषी ठरवण्यात आले आणि शुक्रवारी न्यायालयाने त्याला फाशीची थेट शिक्षा सुनावली. हा ऐतिहासिक निकाल पाहता न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायाधीशांनी जशी फाशीची शिक्षा सुनावली, तसा दोषी जितेंद्र बिथरला आणि स्वतःलाच कोर्टात जोरात थपडा मारून घेऊ लागला. मात्र, कायद्याच्या चौकटीत एका निष्पाप चिमुरड्याचा निर्घृण बळी घेणाऱ्या नराधमाला त्याच्या कर्माची योग्य ती शिक्षा मिळाली, अशा भावना आता व्यक्त होत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group