उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा धक्का बसणार ?  12 नगरसेवक शिंदेंच्या गळाला?
उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा धक्का बसणार ? 12 नगरसेवक शिंदेंच्या गळाला?
img
Nandini khandare More


सध्या राज्यातील राजकरणात मोठ्या घडामोडी सुरु असून सध्या ठाकरे गटाला मोठे हादरे बसत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा एक मोठी अंडी ठाकरे गटासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे 

समोर आलेल्या माहितीनुसार,  शिंदे गटाकडून नाशिकमध्ये ठाकरेंना  मोठा धक्का देण्याच्या हालचाली सुरु आहेत. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक सध्या शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.  नाशिक महापालिकेच्या वर्तुळात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. 


दरम्यान , एका वृत्तानुसार नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 ते 12 नगरसेवकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने गळ टाकला आहे.  ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांच्या शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची  माहिती आहे. ठाकरे गटाच्या या नगरसेवकांना प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दिल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटना विस्तारासाठी सुरु असलेल्या या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group