धक्कादायक  ! साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू ; कुठे घडली घटना
धक्कादायक ! साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू ; कुठे घडली घटना
img
Nandini khandare More

 पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.  पुण्यात खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान या घटनेनें परिसरात हळहळव्यक्त केली जात असून आता या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की , पुण्यातील लोणी काळभोर परिसरात  सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेले खड्डे सुरक्षाव्यवस्था न करता उघडे ठेवल्याने दोन वर्षीय सोहम लखन कसबे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. घरासमोर खेळत असताना सोहमचा पाय घसरून तो खड्ड्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी सुरक्षा उपाययोजना न करता काम अर्धवट सोडल्याचा आरोप होत असून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group