सचिन अहिर यांच्या सोडचिट्ठी नंतर ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार ? तब्बल 14 आमदार अन..
सचिन अहिर यांच्या सोडचिट्ठी नंतर ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार ? तब्बल 14 आमदार अन..
img
Nandini khandare More

सध्या राजकीय पक्षांत  मोठे राजकीय भूकंप होत असून ठाकरे गटाला मोठे हादरे सहन करावे लागत आहे. आधी ६ खासदारांनी बंडखोरो केली आणि त्यांनतर आता ठाकरेंचे आमदार सचिन आहीर यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

भाजप नेते निलेश राणे यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले कि ,  सचिन आहीर होते म्हणूनच आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून यायचे. सचिन आहीर हे वरळीचे माजी आमदार होते. आता सचिन आहिर हेच आमच्य पक्षात आल्यामुळे आदित्य ठाकरेंना झोप लागणार नाही. त्यांचे भविष्यात निवडून येणे मुश्कील आहे, असा टोला निलेश राणे यांनी लगावला. आमच्याकडे येणाऱ्यांची यादी मोठी आहे. ही संख्या मोठी आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. 

महाराष्ट्रातील जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व मान्य करतात. कारण शिंदे साहेब हे 18 तास काम करणारे नेते आहेत. कोणत्याही एका नेत्याचे नाव घेता येणार नाही. कारण काही आमदार आणि काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल. 40 ते 45 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. तर 14 आमदार आमच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांनी वेळ दिल्यानंतर ऑपरेशन तीन आणि ऑपरेशन चारची सुरुवात होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group