काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे याची साथ सोडली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. . या प्रवेशानंतर ठाकरे गटात मोठे वादळ निर्माण झाले होते. दरम्यान आता पुन्हा एका उद्धव ठाकरे याना मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली होती, त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती, या संदर्भात आता सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यावर लोकसभा अध्यक्ष आणि सहा खासदारांनी दोन आठवड्यात उत्तर द्यावं, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
एकीकडे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे, तर दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.