मोठी अपडेट !आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
मोठी अपडेट !आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
img
Nandini khandare More
गडचिरोलीतील धानोरे येथील निवासी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी (10 ऑगस्ट) रोजी घडली. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थीनी साखरझोपेत असताना ही घटना घडली आणि सर्पदंशाने तीन विद्यार्थींनींचा मृत्यू झाला आहे, तर इतर मुलींवर उपचार सुरू आहेत. 

राज्याचे मुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आश्रमशाळेत झोपलेल्या 6 विद्यार्थींना एकाचवेळी सर्पदंश झाला. त्यामध्ये, तीन विद्यार्थींनींचा मृत्यू झाला असून तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेचे पडसाद आज मंत्रालयात उमटल्याचं दिसून आलं. आदिवासी मंत्री महोदयांनी याबाबत, संबंधित आश्रमशाळेच्या संस्थापकांविरुद्ध मंत्रिमंडळ बैठकीत संताप व्यक्त केला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्रमशाळेची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. 

गडचिरोली आश्रमशाळेतील धक्कादायक घटनेचे पडसाद आज मंत्रालयात पाहायला मिळाले. आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू झाल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत, आदिवासीमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांच्यासारखे 3 वेळा आमदार, एकदा खासदार राहिलेले नेते आश्रमशाळा असे चालवत असतील आणि लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर ते कसे माफ करणार? असा सवालच आदिवासी मंत्र्‍यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विचारला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेनंतर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

संबंधित आश्रमशाळेत शिक्षक नाही, वॉर्डन नाही, तर शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नाही. त्यामुळे, या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने तपासणी केली आणि अहवाल दिला, त्याला निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. रस्त्यावरच्या आश्रमशाळांची केवळ पाहणी करू नका, अंतर्गत भागातील आश्रमशाळांची सुद्धा नियमित तपासणी करा. तसेच, संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, असेही आदेश मुख्यमंत्र्‍यांनी दिले. मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वकष तपासणीची यंत्रणा उभी करावी. सर्व विभागांना त्यात समाविष्ट करा, असेही सूचवले. 

आदिवासी आश्रम शाळा आहे, त्यात स्पेशल ऑडिट करावे, इंटिरियर असलेल्या आश्रम शाळांची देखील तपासणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. तसेच, कडक कारवाईचेही बजावले आहे. आश्रम शाळेचे संचालक आणि अधिकाऱ्यांमुळे जीव जाऊ नये यासाठी सूचना दिल्या आहेत. ऑडिटमध्ये सापडले तर सोडायचे नाहीत, गुन्हे दाखल करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group