नाशिक कुंभमेळा !  ‘न भूतो न भविष्यती’; सिंहस्थ नव्हे तर ‘महासिंहस्थ’...
नाशिक कुंभमेळा ! ‘न भूतो न भविष्यती’; सिंहस्थ नव्हे तर ‘महासिंहस्थ’...
img
Nandini khandare More
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरत असतो, दरम्यान , सिंहस्थ कुंभमेळा यंदा न भूतो न भविष्यती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टिकोनातून कुंभमेळ्याची भव्यता अधिक वाढवण्यासाठी आता नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ असे नामकरण येणार असल्याची माहिती नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

यासाठी राज्य शासनाने नियोजन केले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ३४ हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च करण्यात येत आहेत. त्याचे अचूक नियोजन व्हावे, कुंभमेळा यथासांग पार पडावा यासाठी प्रथमच नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण देखील स्थापन करण्यात आले आहे.

बोधचिन्हाची अधिकृतता म्हणून ट्रेडमार्कचे शिक्कामोर्तब केंद्र शासनाच्या माध्यमातून रस्ते, महामार्ग आणि रेल्वेचे जाळे विस्तारतानाच नाशिकमध्ये रिंगरोड आणि परिक्रमा मार्ग तर त्र्यंबकेश्वराला दर्शनपथ कॉरिडॉर अशा नव्या संकल्पनांनी यंदा कुंभमेळ्याची कामे नजरेत भरावी अशी उभी राहत आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिक सिंहस्थ ऐवजी महासिंहस्थ असे नामकरण केले आहे. त्याचे ब्रँडींग तर करण्यात येणार आहेच, शिवाय बोधचिन्हाची अधिकृतता म्हणून त्यावर ट्रेडमार्कचे शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group