१४ वर्षांच्या विद्यार्थ्याने माजवला मृत्यूचा थरार! आजी-आजोबांची हत्या नंतर शाळेत गोळीबार, ५ शिक्षकांची हत्या
१४ वर्षांच्या विद्यार्थ्याने माजवला मृत्यूचा थरार! आजी-आजोबांची हत्या नंतर शाळेत गोळीबार, ५ शिक्षकांची हत्या
img
Nandini khandare More

एका शाळेच्या परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ निर्माण झाली आहे. १४ वर्षीय विद्यार्थ्याने आधी घरात हिंसक कृत्य केल्यानंतर शाळेत येऊन गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाळेमध्ये रक्तरंजित थराराची थरकाप उडवणारी घटना थायलंडमध्ये घडली. १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने आधी घरी आजी-आजोबांची हत्या केली. त्यानंतर शाळेमध्ये येऊन त्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये त्याने ५ शिक्षकांची हत्या केली. थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका शाळेमध्ये ही भयंकर घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने आधी आपल्या आजी-आजोबांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तो ऐवढ्यावर थांबला नाही. तो थायलंडच्या नॉनथाबुरी प्रांतातील शाळेमध्ये गेला आणि त्याठिकाणी त्याने अंदाधुंद गोळीबार करत ५ शिक्षकांना संपवलं. सात जणांची हत्या केल्यानंतर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

थायलंड पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर विद्यार्थ्याने वापरलेली ९ एमएमची हँडगन त्याच्या आजोबांची होती. त्याचे आजोबा शिक्षक होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजताच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारामध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झालेत. जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर आहे. या गोळीबारानंतर शाळेत एकच गोंधळ उडाली. सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोहचण्यापूर्वीच या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. प्रसिद्ध शाळेमध्ये ही गोळीबाराची घटना घडल्यामुळे थायलंड हादरले. सुरूवातीला शाळेतील विद्यार्थ्यांना वाटत होते की कुठे तरी फटाके फोडले जात आहे. आम्हाला वाटले नव्हते की तो बंदुकीचा आवाज आहे. त्यानंतर सगळीकडे शांतता पसरली. पाच शिक्षक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group