मोठी दुर्घटना ! सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू
मोठी दुर्घटना ! सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू
img
Nandini khandare More

गेल्या अनके दिवसांपासून अनेक दुर्घटना घडत असून आता मिरजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.  मिरज सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचं काम सुरू असताना एक दुर्घटना घडली. 

समोर आलेल्या माहितीनुसार , व्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळून सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.  रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात येणारी नवीन कमान अचनाक कोसळली. कमानीचा स्लॅब कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्दैवी अपघातामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.  यापैकी 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 7  जण जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. स्लॅब कोसळल्यानंतर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी पाच ते सहा कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून, इतरांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

अचानक कोसळला स्लॅब

मिळालेल्या माहितीनुसार,  मिरजनधील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्यात  येत होती.  त्याच कमानीचं काम सुरू होतं. मात्र स्लॅब टाकत असताना थोडयावेळापूर्वी अचानक तो स्लॅब खाली कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. त्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले, काही जखमी झाले. त्यांना बाहेर काढण्याचं बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी 6 ते 7 जणांना बाहेर काढण्यात यश आलं. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतयं.  दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीने स्लॅबचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी असून पोलिसांसह रुग्णालय प्रशासन ही दाखल झालं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group