नवरात्री हा उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लहान्यांनपासून मोठ्यांपर्यंत दांडिया, गरबा खेळाला जातो. अनेक ठिकाणी गरबा आणि दांडीयाचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. दरम्यान आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता एक बातमीस समोर येत आहे. संभाजी ब्रिगेडच्या मते, काही ठिकाणी गरब्यासाठी हजार ते पाच हजार रुपये घेऊन पार्टनर उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती केल्या जात आहेत.
दरम्यान , महाराष्ट्रामध्ये गरब्याच्या नावाखाली पैसे घेऊन पार्टनर देण्याच्या पद्धतीला संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे ठामपणे सांगत ब्रिगेडने यावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या मते, काही ठिकाणी गरब्यासाठी हजार ते पाच हजार रुपये घेऊन पार्टनर उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती केल्या जात आहेत. हा धार्मिक कार्यक्रमाचा विपर्यास असून, अश्लील चाळे व डान्स बार संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. ब्रिगेडने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.
अशा जाहिरातींवर आणि गरब्यामध्ये पार्टनर विकण्याच्या कार्यक्रमांवर त्वरित बंदी घालावी, अशी त्यांची मागणी आहे. सध्या महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी-कामगारांची दुरवस्था आणि तरुणांच्या हाताला काम नसताना, अशा चुकीच्या गोष्टी समाजात पसरवल्या जात असल्याबद्दल ब्रिगेडने चिंता व्यक्त केली. संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्राची ओळख जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि रमाई यांच्या कर्तृत्वाने आहे. पैशावर पार्टनर विकणाऱ्यांचा हा महाराष्ट्र नाही. जर सरकारने यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर संभाजी ब्रिगेड असे कार्यक्रम उधळून लावेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.