साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात IIT मुंबईची कारवाई ! डीन प्रा.सूर्यनारायण दुल्ला निलंबित; संस्थेचा माफीनामा
साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात IIT मुंबईची कारवाई ! डीन प्रा.सूर्यनारायण दुल्ला निलंबित; संस्थेचा माफीनामा
img
Nandini khandare More
आयआयटी मुंबईतील (IIT Bombay) 'ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी' विभागाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान,  साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केल्यानंतर आयआयटी मुंबईने पहिला निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी मागणी केल्याप्रमाणे प्राध्यापक आणि अधिष्ठाता सूर्यनारायण दुल्ला यांना पदावरून निलंबित करण्यात आल आहे. आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान  साहिल वाकोडे याच्या आत्महत्येच्या  या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला  यांना तातडीने पदावरून निलंबित केले आहे. याशिवाय, घटनेनंतर लगेचच घाईघाईत काढलेले आपले आधीचे वक्तव्य मागे घेत प्रशासनाने अधिकृत माफीनामा जारी केला आहे. दरम्यान, संचालक केदारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा अफवा असल्याचे सांगत संस्था प्रशासनाने ते कार्यरत असल्याचे स्पष्ट केले.

साहिलच्या निधनानंतर आयआयटी प्रशासनाने घाईघाईत केलेल्या वक्तव्यांवरून तीव्र खेद व्यक्त केला आहे. कोणतीही अधिकृत चौकशी पूर्ण होण्याआधीच घटनेबाबत निष्कर्ष काढणे आणि चुकीची माहिती देणे अयोग्य होते, असे संस्थेने मान्य केले. "साहिलच्या आत्महत्येप्रकरणी आधी काढलेल्या पत्रकातील माहितीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच घटनेची कारणे मांडणे अनुचित होते," असे स्पष्टीकरण आयआयटीने दिले आहे.

काय होता आधीचा दावा आणि वाद ?

१८ सप्टेंबर रोजी मध्य-सत्र परीक्षेदरम्यान साहिलने टोकाचे पाऊल उचलले होते. या घटनेनंतर १९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या सुरुवातीच्या निवेदनात आयआयटीने असा दावा केला होता की, साहिल परीक्षेदरम्यान मोबाईलवर 'चॅटजीपीटी'चा वापर करताना पकडला गेला होता. त्याला केवळ समुपदेशन करून कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन देण्यात आले होते, असे प्रशासनाने म्हटले होते. मात्र, पोलीस तपास सुरू असतानाच विद्यार्थ्यावर आरोप केल्यामुळे आयआयटी प्रशासनावर चौफेर टीका झाली होती.

इतर बातम्या
Join Whatsapp Group