रात्री टेरेसवर फिरायला गेलेल्या तरुणीवर सिक्युरिटी गार्डकडून अत्याचार ! PG हॉस्टेलमधील संतापजनक घटना
रात्री टेरेसवर फिरायला गेलेल्या तरुणीवर सिक्युरिटी गार्डकडून अत्याचार ! PG हॉस्टेलमधील संतापजनक घटना
img
Nandini khandare More
देशभरातील  महिलांवरील तरूणींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना समोर येत असून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरअसतानाच आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक असा प्रकार घडलाय ज्यमुळे तळपायातली आग मस्तकात गेल्या शिवाय राहणार नाही. 

अहमदाबाच्या जोधपूरमध्ये एका सोसायटीच्या टेरेसवर २२ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय सुरक्षा रक्षक धर्मसिंग याला अटक केली आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील असून, तो संबंधित सोसायटीत केवळ सहा दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षक म्हणून कामावर रुजू झाला होता. 


पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी शहरात इंटिरिअर डिझाइनचे शिक्षण घेत असून सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. शनिवारी रात्री ती सोसायटीच्या टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केल्यानंतर आरोपीने तिच्यावर हल्ला केला आणि गळ्याभोवती वायर गुंडाळून तिला थांबवले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार जवळपास तासभर सुरू होता. गळ्याभोवती असलेल्या वायरमुळे तिला मदतीसाठी आरडाओरड करता आली नाही. घटनेनंतर आरोपीने तिचा मोबाइल घेऊन टेरेसचा दरवाजा बाहेरून लॉक केला आणि तेथून पळ काढला. त्यानंतर तरुणीने मदतीसाठी आवाज दिला. खालील मजल्यांवर राहणाऱ्या रहिवाशांनी तिचा आवाज ऐकून तिला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी घटना घडण्याच्या सुमारास लिफ्टने टेरेसकडे जाताना दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी पहाटे आरोपीला हेबतपूर परिसरातून अटक करण्यात आली. पोलिस आता आरोपीला पीडितेबाबत आधीपासून माहिती होती का, याचा तपास करत आहेत. तसेच संबंधित सुरक्षा एजन्सीकडून त्याची नियुक्ती आणि नोंदणीची माहितीही तपासली जाणार आहे. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी ती मानसिक धक्क्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group