लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून ₹३,००० जमा होणार ? मोठी अपडेट आली समोर
लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून ₹३,००० जमा होणार ? मोठी अपडेट आली समोर
img
Nandini khandare More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.लाडक्या बहि‍णींना हप्ता कधी मिळणार? सध्या लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. क्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्याचा सरकारकडून विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट ३००० रुपये जमा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 ऑगस्ट महिन्याचेही काही दिवस उलटून गेले आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये एकाच वेळी खात्यात जमा करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. महिला व बाल विका, विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिल्याचे वृत्त आहे. पण १५ ऑगस्टलाच पैसे जमा होतील, याची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. 

दरम्यान, काही अहवालांमध्ये नमूद केल्यानुसार २० ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group