मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेचे दोन खासदार शपथ घेणार? ''या'' खासदारांची नावं समोर
मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेचे दोन खासदार शपथ घेणार? ''या'' खासदारांची नावं समोर
img
Nandini khandare More

राजकरणात मोठे राजकीय भूकंप सुरु असून शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठे झटके देण्यात येत आहेत. याचदरम्यान आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर मंत्रि‍पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत.

श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. मागच्या 12 वर्षांपासून ते खासदार आहेत. आता ऑपरेशन टायगरमध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांची महत्वाची भूमिका होती. पक्ष विस्तारासाठी सतत त्यांचे दौरे सुरु असतात. आता त्यांच्यावर मंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा आहे. फुटलेल्या खासदारांपैकीही एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांचे नाव मंत्रि‍पदासाठी आघाडीवर आहे. फुटलेल्या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांचीच सर्वात जास्त चर्चा झाली. ओमराजे निंबाळकर यांचा तळागाळातील कार्यकर्ते, जनता यांच्याशी संपर्क आहे. ठाकरे गटाकडून त्यांच्यावरच सर्वात जास्त टीका करण्यात आली. ओमराजे निंबाळकर स्वत: ग्राऊंडवर उतरुन काम करतात. लोकांच्या प्रश्नाना भिडतात. त्यामुळेच ओमराजे निंबाळकर यांच्या रुपाने आणखी एका तरुण खासदाराला एकनाथ शिंदे मंत्रि‍पदाची संधी देतील अशी चर्चा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group