इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि मह्त्वाची बातमी समोर आली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या नियमांत मोठा बदल झाला असल्याची अपडेट आहे. नव्या नियमानुसार आयटीआर फाइल करावा लागणार आहे. तुम्ही आयटीआर भरला नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाती आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असेल, या गृहीतकावर असाल तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
अनेक संस्थांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये इंक्रिमेंट व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या सॅलरी स्लीपमध्ये नव्या लेबर कोडनुसार बदल होत आहेत. या नव्या बदलेल्या नियमानुसार आता पगार येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला नव्या नियमानुसार आयटीआर फाइल करावा लागणार आहे. तुम्ही आयटीआर भरला नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाती आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असेल, या गृहीतकावर असाल तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
आयकर विभागाने मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये मोठे बदल केले आहेत. बजेट २०२६ मधील सुधारणांनुसार, आता सर्वांसाठी एकच तारीख नसेल. तुम्ही कोणता फॉर्म भरता, यावर तुमची डेडलाईन ठरणार आहे. ज्यांचे उत्पन्न पगार किंवा पेन्शनमधून आहे (ITR-1 आणि ITR-
छोटे व्यावसायिक, दुकानदार, डॉक्टर, वकील आणि फ्रीलान्सर्स (ITR-3 आणि ITR-4) यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना आपले रिटर्न भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, जेणेकरून हिशोबाची जुळवाजुळव करण्यासाठी पूर्ण एक महिना जादा मिळेल.
करदात्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सोय करण्यात आली आहे. यापूर्वी रिटर्नमधील चूक सुधारण्यासाठी 'रिव्हाइझ्ड रिटर्न' भरण्याची मुदत ३१ डिसेंबर असायची. आता ही विंडो थेट ३१ मार्च २०२७ पर्यंत उघडी राहील. त्यामुळे एखादा क्लेम राहून गेला असेल, तर तो दुरुस्त करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.
मुदत चुकल्यास ५ हजार रुपयांपर्यंत लेट फी तर लागेलच, पण सर्वात मोठा फटका म्हणजे करदात्याला जुनं टॅक्स रिजीम निवडता येणार नाही. तो थेट नवीन कर व्यवस्थेत शिफ्ट केला जाईल. याशिवाय व्यावसायिक किंवा कॅपिटल लॉस पुढील वर्षासाठी फॉरवर्ड करता येणार नाही.
ज्या व्यवसाय किंवा कंपन्यांचे टॅक्स ऑडिट होणार आहे, त्यांच्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, ऑडिट रिपोर्ट एक महिना आधी म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत जमा करावा लागेल.
कलम 234F अंतर्गत ५,००० रुपये लेट फी लागेल उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असल्यास १,००० रुपये आणि थकीत करावर व्याज द्यावे लागेल. जर तुम्ही
करदात्यांसाठी आणखी एक दिलासादायक बदल करण्यात आला आहे. आधी आपल्या रिटर्नमधील चूक सुधारण्यासाठी रिव्हाइझ्ड रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर असायची. या वर्षापासून ही विंडो वाढवून थेट ३१ मार्च २०२७ करण्यात आली आहे.
फॉर्म भरल्यानंतर जर तुम्हाला 80C अंतर्गत सूट क्लेम करायची राहून गेल्याचे आठवले किंवा तुमच्या AIS/26AS फॉर्ममध्ये काही तफावत आढळली, तर ती दुरुस्त करण्यासाठी आता भरपूर वेळ मिळणार आहे.