धक्कादायक ! कारमधील एअरबॅगनेच घेतला तरुणाचा जीव ! कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! कारमधील एअरबॅगनेच घेतला तरुणाचा जीव ! कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More

अनपेक्षितपणे कारमधील एअरबॅग उघडल्याने एका तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. कारमध्ये एअरबॅग ही सुरक्षिततेसाठी दिलेली असते. कारचालकासह कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअरबॅग दिली जाते. अपघाताच्यावेळी जिवीतहानी होऊ नये, प्रवाशांचे जीव वाचावेत यासाठी एअरबॅग दिलेली असते. मात्र ह्याच एअरबॅगमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

 मिरा-भाईंदरच्या प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जी एअरबॅग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असते, ती अचानक उघडल्यामुळे एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव मोहित सोनी (२५) असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गाडी चालवताना गाडीतील एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली. या घटनेत मोहित सोनी यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी टेंबा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.


मोहित सोनी यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय? गाडीतील एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली? या घटनेला अन्य कोणती तांत्रिक कारणे आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय अहवाल, तांत्रिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येत असून, अधिक तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे. आठ सीट असलेल्या चारचाकी गाड्यांसाठी 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group