येवला: तालुक्यातील एरंडगाव परिसरात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. भरधाव क्रेटा कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एरंडगाव येथील वर्मा लॉन्ससमोरून प्रवीण डुकरे हे आपल्या मोटर सायकल क्र. MH 15 GD 6888) या मोटर सायकलवर कुटुंबासह जात होते. दरम्यान, मागून भरधाव वेगाने आलेल्या क्रेटा कार (क्र. MH 15 HSC 7170) या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील हेमा डुकरे आणि त्यांची ९ वर्षांची मुलगी संस्कृती डुकरे यांचा जागीच मृत्यू झाला. आणि
या अपघातात दुचाकीस्वार प्रवीण डुकरे आणि त्यांचा मुलगा आदेश डुकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही तत्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पोलीस तपासात चालक सागर सोपान पाबळे एरंडगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले
येवला तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणारी क्रेटा कार चालक सागर सोपान पाबळे एरंडगाव येथीलच रहिवासी असल्याची जोरदार चर्चा आहे. अपघातानंतर चालक कार सोडून फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय हर्षवर्धन बहिर हे करत आहेत