केतन हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट  ! सिया-चेतनच्या प्लॅनमध्ये आणखी एका व्यक्तीचा समावेश ?
केतन हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट ! सिया-चेतनच्या प्लॅनमध्ये आणखी एका व्यक्तीचा समावेश ?
img
Nandini khandare More

केतन हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणात दर दिवशी नवीन अपडेट असून आता या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार , मयत केतन अग्रवालच्या वडिलांनी आता नवा संशय व्यक्त केलाय. केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणात आणखी एकाची एंट्री झाली आहे. सिया आणि चेतनच्या प्लॅनमध्ये सियाचा भाऊचाही समावेश होता, असा संशय केतनचे वडील यांनी व्यक्त केला, त्यानंतर आता त्याचीही चौकशी होणार आहे. सियाचा भाऊ साहिल आणि तिचा बॉयफ्रेंड हे खास मित्र होते, त्यामुळे केतनच्या हत्येचा प्लॅन आणखी काही जणांना माहिती असण्याचा संशय आहे, असं विशाल अग्रवाल म्हणालेत.

विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती, ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. पुण्यातील लोहगडवर उद्योगपती असलेल्या केतन अग्रवालची 18 जून रोजी हत्या झाली होती.

केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी त्याला गडावरून ढकलून देऊन हत्या केल्याची बाब उघडकीस आलं. या प्रकरणात आता सियाच्या भावाची, म्हणजे साहिल गोयलची चौकशी करण्यात येत आहे. केतनच्या हत्या प्रकरणात सिया आणि चेतन यांच्याबरोबरच अजून काही लोकांचा हात असण्याची शक्यता विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group