भूकंपानंतर ढिगाऱ्यातून ऐकू आला बाळाचा रडण्याचा आवाज !  वाचले दोन जीव
भूकंपानंतर ढिगाऱ्यातून ऐकू आला बाळाचा रडण्याचा आवाज ! वाचले दोन जीव
img
Nandini khandare More

 देव तरी त्याला कोण मारी हि म्हण खरी असल्याचा प्रत्यय व्हेनेझुएला येथे झालेल्या भूकंपामुळे आला आहे.  व्हेनेझुएला झालेला भूकंप इतका जबरदस्त होता कि  आतापर्यंत या आपत्तीत 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3000 हून अधिक जण जखमी असल्याची माहिती आहे. परंतु याच शक्तिशाली भूकंपात एक आश्चर्य घडलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलाच्या उत्तर भागात बुधवारी झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने खळबळ माजली आहे. आतापर्यंत या आपत्तीत 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एका अहवालानुसार, अद्याप जवळपास 70,000 हून अधिक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावर कोसळलेल्या बहुमजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले आहेत. प्रशासन आणि त्यांच्या नातेवाईकांकडून शोध सुरू आहे. या आपत्तीदरम्यान एका ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 18 दिवसांच्या मुलाला देखील यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. या बाळाच्या रडण्याच्या आईचा देखील वाचला आहे. या चमत्कारिक घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

ला गुआरा या भागात एक 8 मजली इमारत भूकंपाच्या धक्क्याने कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक 18 दिवसांचा चिमुकला देखील अकडला. या बाळाला वाचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले होते. परंतु १२ तासांनंतरही बाळ सापडत नव्हते. परंतु त्यानंतरही प्रशासनाचे मदतीचे कार्य सुरूच होते. परंतु अचानक सकाळी बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर बचाव पथकाच्या जवानांनी तातडीने ढिगारा हटवला. त्यावेळी १८ दिवसांच्या चिमुकल्यासोबत आई देखील आढळून आली.

बचाव पथकाचे जवान आणि स्वयंसेवकांनी शुक्रवारी आई आणि बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. इमारतीचा ढिगारा अंगावर कोसळूनही बाळ आणि त्याच्या आईला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नव्हती. या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.



इतर बातम्या
Join Whatsapp Group