मोठी कारवाई ! TET पेपरफुटी प्रकरणी 3 जण पोलिसांच्या ताब्यात
मोठी कारवाई ! TET पेपरफुटी प्रकरणी 3 जण पोलिसांच्या ताब्यात
img
Nandini khandare More

उद्या होणारा शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून आता 3 जणांना पोलिसांच्या ताब्यात घेणयात आले आहे. 

ठाण्यातील पेपर फुटीप्रकरणी आता पोलिसांकडून पहिली मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळी विरोधात भिवंडीत कारवाई करण्यात आली आहे. कोनगाव पोलिस ठाणे हद्दीत लावलेल्या सापळ्यात तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद होत आहे. त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाणार आहे.

टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी, महाराष्ट्रातील एकूण 37 ठिकाणी 1728 केंद्रावरती जवळपास सहा लाख 125 विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा उद्या होणार होती. आता पेपर फुटी प्रकरणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान  पेपरफुटी नंतर एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतलं जाणार नाही, पुनर्परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. अशी माहिती समोर आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group