वर्धिष्णु एज्युकेशन सोसायटी संचलित आरंभ पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
वर्धिष्णु एज्युकेशन सोसायटी संचलित आरंभ पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
img
Nandini khandare More

नाशिक प्रतिनिधी : देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, नाशिक शहरातही विविध शाळांमध्ये देखील योग  दिन साजरा झाला असून वर्धिष्णु एज्युकेशन सोसायटी संचलित आरंभ पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या संचालिका अस्मिता मोगल यांच्या   मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात प्री-स्कूलमधील तीन ते सहा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली.


यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षासन, वज्रासन, भुजंगासन, बालासन यांसह विविध योगासने उत्साहाने सादर केली. तसेच ‘ॐ’ पठणातून योगाचे आध्यात्मिक व मानसिक महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले.तसेच , कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुचिता गीते, मंजिरी चौधरी, रसिका गायकवाड, शारदा सूर्यवंशी यांनी विशेष सहकार्य केले.

                                                                                                     
इतर बातम्या
Join Whatsapp Group