बिग बॉसच्या शोची अभिनेत्रीकडून शोची पोलखोल !  सिगरेट, दारू, बाथरुममध्ये सेक्स अन्…,,नेमकं काय म्हणाली ?
बिग बॉसच्या शोची अभिनेत्रीकडून शोची पोलखोल ! सिगरेट, दारू, बाथरुममध्ये सेक्स अन्…,,नेमकं काय म्हणाली ?
img
Nandini khandare More

‘बिग बॉस’ हा वादग्रस्त आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. घरातील भांडणं, नाती, टास्क आणि स्पर्धकांमधील संघर्ष यामुळे हा शो कायम चर्चेत असतो. मात्र, प्रेक्षकांना पडद्यावर दिसणाऱ्या घटनांपलीकडे घरात नेमकं काय घडतं, याबाबत नेहमीच उत्सुकता असते.

आता ‘बिग बॉस OTT’च्या पहिल्या पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल  हिने शोबाबत मोठा खुलासा करत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने ‘बिग बॉस’च्या पडद्यामागील काही गोष्टींवर भाष्य केले. तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, शोच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.


सांगायचं झालं तर, शोबद्दल अनेक अफवा पसरलेल्या असतात. घरात मिळणाऱ्या दारू पासून सिगरेट आणि स्पर्धकांच्या खाजगी आयुष्याबद्दल दिव्या हिने मोठे खुलासे केले आहेत. दरम्यान, दिव्या हिने सर्व प्रश्नाची उत्तर दिली आहेत, जी शो संपल्यानंतर स्पर्धकांना विचारली जातात. पॉडकास्टमध्ये दिव्या हिने घरात मिळणाऱ्या पदार्थांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

दिव्या म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात टोमॅटो केचप देखील एखाद्या लग्जरी प्रमाणे वाटतो. जो स्पर्धकांना सहज मिळत नाही. अशात केचप बनवण्यासाठी मी थोडाफार जुगाड करायचे. पण इतकी कडक बंधने असूनही, सिगारेट्सच्या बाबतीत मात्र निर्माते बऱ्याच अंशी सवलत देतात…’

दिव्या हिने सांगितल्यानुसार, सिगरेट गरजेची गोष्ट नाही, ती स्पर्धकांना सतत मिळत असते… एवढंच नाही तर, रोज सकाळी स्पर्धकांना त्यांचा ब्रँड विचारला जातो. त्यानंतर स्पर्धकांच्या ब्रँडची सिगरेट त्यांना आणून दिली जाते.., तर प्रेक्षकांच्या मनात असा देखील प्रश्न असतो की, ‘विकेंड का वार’ किंवा पार्टी झाल्यानंतर स्पर्धकांनी दारु दिली जाते का?

दारुच्या प्रश्नावर दिव्या उत्तर देत म्हणाली, ‘लोकांना असं वाटतं की, दारु मिळत असेल, पण खरं तर बिग बॉसच्या घरात कोणालाच दारु दिली जात नाही. ही फक्त अफवा आहे की, स्पर्धकांनी घरात दारु मिळते.’ याच दरम्यान, दिव्या हिने, स्पर्धकांचं खासगी आयुष्य आणि इतर स्पर्धकांसोबत असलेल्या नात्यांबद्दल हैराण करणारं वक्तव्य केलं.

‘बिग बॉसच्या घरात सेक्स होतं का?’ असा प्रश्न देखील दिव्याला विचारण्यात आला. यावर दिव्या म्हणाली, ‘कॅमेऱ्यासमोर काही दिसत नसलं तरी, पडद्यामागे खूप काही होत असतं.’ पुढे शार्दुल पंडित म्हणाला, ‘होतं तर खूप काही, पण बाथरुममध्ये होत असतं… ‘, याव्यतिरिक्त, दिव्याने हसत-हसत सांगितलं की, लोक तिला खूपच विचित्र प्रश्न विचारतात; एकदा तर एकाने विचारलं होतं की ‘वॅक्सिंग’ची सेवा देण्यासाठी मुली घरात येतात का? असं काहीही घडत नाही… अभिनेत्री दिव्या म्हणाली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group