राज्यात सध्या महिला सुरक्षित नसून महिलांवर होणारे अन्याय अत्याचार छळ विनयभंग अशा गंभीर घटना वारंवार घडत या घटनांना आलं असणे आता अवघड झाले आहे. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात एका खासगी रुग्णालयात महिला रुग्णाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरने अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर धैर्यशील शेटके याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच पुढील तपासानंतर आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.