बापरे ! चेहऱ्यावर  पिंपल आल्यानं नाराज ! 27 वर्षीय विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
बापरे ! चेहऱ्यावर पिंपल आल्यानं नाराज ! 27 वर्षीय विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
img
Nandini khandare More

पुण्यामधुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . जे ऐकल्यानंतर विश्वासच बसनार नाहीकी असेही होऊ शकते का ? किंवा असेही कोणी वागू शकते का असा विचार आल्या शिवाय राहणार नाही. 

पुण्यातील चाकणजवळील आंबेठाण परिसरातून ही घटना समोर आली आहे. चेहऱ्यावरील फोडामुळे या महिलेनं आपलं आयुष्यच संपवलं. पती तिला यावरील उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जाणारच होता. पती अवघ्या अर्ध्या तासासाठी गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी घराबाहेर गेलेला असताना, इकडे विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. चेहऱ्यावरील पिंपल्समुळे आलेल्या मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी संदीप पाटील (वय २७, रा. आंबेठाण) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्वचेच्या त्रासामुळे चेहऱ्यावर फोड आल्यानं डॉक्टरकडे जायचं असल्याचं पत्नीनं पतीला सांगितलं. मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सातच्या सुमारास अश्विनी यांचे पती संदीप हे 'गाडीत पेट्रोल टाकून येतो' असे सांगून दुचाकीवरून आंबेठाण चौकात गेले होते. मात्र, अवघ्या साडेसात वाजता ते जेव्हा घरी परतले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. संदीप यांनी वारंवार हाका मारून आणि दरवाजा वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घाबरलेल्या संदीप यांनी सोसायटीतील नागरिक राकेशकुमार, मंगेश बनकर आणि इतर रहिवाशांना गोळा केले. शेवटी तात्काळ 'डायल ११२' वर फोन करून पोलिसांना पाचारण करण्यात आले.

चाकण उत्तर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत प्रवेश केला असता किचनमधील स्लॅबच्या लोखंडी हुकाला सुताच्या दोरीने अश्विनी यांनी गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. पोलिसांनी त्यांना तातडीने खाली उतरवून रुग्णवाहिकेद्वारे चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

"चेहऱ्यावर फोड आल्यामुळे अश्विनी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होत्या, त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या पतीने सांगितले आहे. मात्र, पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके आणि अंतिम कारण स्पष्ट होईल."

इतर बातम्या
Join Whatsapp Group