गेल्या अनेक दिवसांपासून राजकरणात अनेक मोठ्या घडामोडी घडत असून उद्धव ठाकरे गटाला अनेक मोठं मोठे हादरे बसताना दिसत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे.
पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पालघर येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रथमेश पिंपळे यांच्यासह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. पालघरचे उबाठा गटाचे माजी नगरसेवक प्रथमेश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामपंचायतींच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे पालघरमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले.
यावेळी प्रथमेश पिंपळे यांच्यासह पालघर नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार ॲड. रवींद्र गडग, हेमांगी भगत, पालघर वाहतूक सेनेचे माजी शहराध्यक्ष सचिन राऊत, माजी युवा सेना शहर प्रमुख सतीश शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पालघर शहर सचिव विशाल पवार, बहुजन विकास आघाडीचे रविंद्र पिंपळे, पुष्पक पाटील, केतन मोरे यांच्यासह अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, भाजपा हा जातीव्यवस्थेच्या बाहेर जाऊन समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांच्या कर्ज आणि वीज बिल माफीने कृषी क्षेत्रातही सकारात्मक परिणाम होणार आहे. भाजपावर विश्वास ठेऊन आलेल्या या पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही.'