राज्यातील लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधन सण जवळ येत असताना महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल परत एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यामध्ये राज्यातल्या महिलांना गेला काही महिन्यांपासून लाडक्या बहिणींचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नाराज झाल्या आहेत. ई-केवायसी प्रक्रिया झाल्यानंतर काही अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेतायेत असं समोर आलं. त्यामुळे त्यांचा १५०० रुपयांचा हप्ता वगळ्यात आला. पण या महिलांनामध्ये काही पात्र महिलांचाही लाभ वगळण्याची माहिती एका वृत्तात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रसिद्धा झालेल्या माहितीनुसार, राज्यातल्या ९२ लाख लाभार्थ्यांना पडताळणी करून योजनेतून वगळण्यात आलं आहे. महालेखापाल (CAG) च्या अहवालात योजनेबद्दल ३५०० कोटींच्या आर्थिक अनियमिततेचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
अकोला येथील मारुती नगर परिसरातल्या दोन महिलांच्या अनुभवामुळे हा मुद्दा जास्त चर्चेत आलेला आहे. संगीता गेडाम या महिलेला आजही दर महिन्याला १५०० रुपयांचा हप्ता येतोय. तर या पैशातून त्यांच्या घरातला किराणा आणि दैनंदिन खर्च त्या भागवतात. पण निवडणुकीच्या वेळेस जाहीर करण्यात आलेली २१०० रुपयांच्या मदतीची घोषणा अजून पूर्ण झालेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच दुसरीकडे, पूनम कौसतर यांचा हप्ता गेल्या तीन महिन्यांपासून बंद झालेला आहे. त्यांनी ई- केवायसीसोबत सर्व आवश्यक प्रोसेस पूर्ण केली तरी बँक आणि संबंधित कार्यालयाकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. या पैशातून गॅस सिलेंडर, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, पात्र महिलांचे पैसे बंद केले जाणार नाहीत. सध्या सुरू असलेली पडताळणी फक्त अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आहे. पात्र महिलांना योजनेचा लाभ रोजच्या रोज मिळत राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पडताळणी झाल्यावर पात्र महिलांच्या खात्यात पुन्हा हप्ते जमा होतात का, याकडे आता राज्यभरातल्या लाखो लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.