सोनम वांगचुक यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा !  पत्नीची तातडीची मागणी
सोनम वांगचुक यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा ! पत्नीची तातडीची मागणी
img
Nandini khandare More
नीट पेपरफुटीच्या विरोधात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना  आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आंदोलन स्थळावरुन हटवल्याचं सांगितलं जातंय. 

नवी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर जबरदस्तीने उपचार सुरू आहेत. त्याचवेळी त्यांच्या पत्नी गितांजली अंगमो यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना एक पत्र लिहून वांगचुक यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात यावं अशी मागणी केली आहे. सफदरजंग रुग्णालयाने वांगचुक यांचा मेडिकल रिपोर्ट दिला नसल्याने गितांजली यांनी प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता. मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलनस्थळावरुन उचलून अँब्यूलन्समधून थेट रुग्णालयात दाखल केलं. 

सोनम वांगचुक यांच्या पत्नीने, गितांजली अंगमो यांनी सफदरजंग रूग्णालय अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. परवानगीशिवाय सोनम वांगचुक यांना कोणतंही इन्ट्राव्हेनस इंजेक्शन देऊ नका अशी मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना सफदरजंग रूग्णालयातून अन्यत्र हलवण्याची मागणी गितांजली अंगमोंनी केली.

रुग्णालय प्रशासनाकडे वांगचुक यांच्या मेडिकल रिपोर्टची मागणी करूनही त्याची कॉपी दिली जात नसल्याचा आरोप गितांजली अंगमो यांनी केली आहे. तसेच वांगचुक यांच्या आंदोलनावेळी त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनाही आता भेटू दिलं जात नसल्याचा आरोप केला जात आहे. 

सफदरजंग रूग्णालय प्रशासन पारदर्शकता दाखवत नाही, असा आरोप गितांजली अंगमो यांनी केला आहे. त्यामुळे वांगचुक यांना तातडीने डिस्चार्ज द्या, त्यांना आम्ही दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जातो अशी मागणी गीतांजली अंगमो यांनी केली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group