पोटगी प्रकरणात एक व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने एका चांगलाच दणका दिला आहे. पत्नीचे लग्नापूर्वी इतर व्यक्तींशी असलेले शारीरिक संबंध हे 'व्यभिचार' या व्याख्येत मोडत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने केला आहे.
विवाहपूर्व संबंध आणि वैवाहिक कायद्यांतर्गत येणारा व्यभिचार यांच्यात स्पष्ट फरक स्पष्ट करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. पत्नीचे लग्नापूर्वी इतर व्यक्तींशी असलेले शारीरिक संबंध हे 'व्यभिचार' या व्याख्येत मोडत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने केला आहे. या निर्णयामुळे कायद्यातील व्यभिचाराची व्याख्या आता अधिक स्पष्ट झाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण? न्यायालयात दाखल असलेल्या एका प्रकरणात, पतीने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. पत्नीचे लग्नापूर्वी अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंध होते, त्यामुळे ती व्यभिचारी आहे आणि अशा पत्नीला पोटगी मिळण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा पतीने केला होता. पतीच्या या दाव्याच्या आधारे पत्नीची पोटगी बंद करण्यात यावी, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली होती.