महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पश्चिम बंगालमधील खरदाह येथे भरदिवसा एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. बस स्टॉपवर उभ्या असलेल्या तरुणाने केलेल्या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.पश्चिम बंगालमध्ये खरदाह येथे हा प्रकार घडला असून नेहमीच वर्दळ असणाऱ्या बीटी रोडच्या एका बस स्टॉपवर एक तरुण उभा होता. काही वेळानंतर त्या बस स्टॉप समोरच एका महिलेने आपली दुचाकी थांबवली आणि कोणाची तरी वाट पाहू लागली.
मात्र थोड्याचवेळात संबंधित तरुणाने महिलेसोबत जे केलं त्या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घडलं असं की बीटी रोडच्या एका बस स्टॉपवर एक तरुण उभा होता. या दरम्यान महिलेने बस स्टॉप समोरच आपली स्कुटी लावली. काही वेळाने संबंधित तरुणाने महिलेकडे बघून अश्लील हावभाव केले. महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तो तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवला. विशेष म्हणजे ही महिला दुसरी तिसरी कोणीही नाही तर एका जवळच्या पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल होती.
त्याने केलेले अश्लील चाळे बघून महिला कॉन्स्टेबलची चांगलीसच सटकली अन मग तिने तिने तरुणाची कॉलर पकडून तब्बल ४०० किमी खेचत पोलीस ठाण्यात नेले. सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांना वाटलं की किरकोळ भांडण झालं असेल. मात्र काही क्षणात महिलेचा चढलेला आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी जमा झाले. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तरुणाला चांगलाच चोप दिला.
पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संबंधित महिला ही त्या पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल असल्याचे समोर आले. आरोपी तरुणाचे नाव आकाश घोष असून तो एका कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपांची चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.