सासू सुनेचं नातं म्हंटलं की त्यांच्यात भांडणं ही होणारच. कितीही गोडवा असला तरी कशावरून ना कशावरुन संशय सुने मध्ये वाद हे होतातच. परंतु एका सासू सुनेचा एक वाद आणि सुनेला अन्वर झालेला राग यामुळे एक गंभीर घटना घडली आहे.
सध्या भात पेरणीचा हंगाम सुरु असून कोकणातल्या वाड्यांमध्ये भात पेरणीला सुरुवात झाली आहे. अशातच सासूने सुनेला शेतातील काम करण्यासाठी सकाळी लवकर उठवले. याचाच राग मनात धरून सुनेने सासूला अमानुष मारहाण केली. तसेच शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत सुनेविरोधात तक्रार दाखल केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे घडली आहे. या गावात रहिवासी असलेले नाचरे कुटुंबातील सुवर्णा नाचरे (वय ७१) यांनी आपली सून मयुरी नाचरे हिला सकाळी लवकर उठून शेतातील पेरणीच्या कामात मदत करायला सांगितली.
सासूवर भीषण हल्ला मात्र झोपेतून उठवल्यामुळे मयुरी संतापली आणि दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानंतर सुनेने सासूला अपशब्द आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर रागाच्या भरात मयुरीने घरातील चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फळीने सासूवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सुनेला शिक्षा या मारहाणीत सुवर्णा नाचरे जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. सुवर्णा नाचरे यांच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी मयुरी दर्शन नाचरे हिच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.