रेल्वे रूळ ओलांडताना शिक्षकाचा अपघाती  मृत्यू ; नाशिकमधील घटना
रेल्वे रूळ ओलांडताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू ; नाशिकमधील घटना
img
दैनिक भ्रमर
येवला प्रतिनिधी :- येवल्यातील पटेल कॉलनी परिसरात राहणारे आणि स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक, संग्राम सिंग तीर सिंग जाधव, यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदे सर रेल्वे चौकीजवळून  रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा पूर्ण केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

​एक आदर्श शिक्षक गमावल्यामुळे स्वामी मुक्तानंद विद्यालय आणि पटेल कॉलनी परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. एका कर्तव्यदक्ष शिक्षकाच्या अशा आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे."
इतर बातम्या
Join Whatsapp Group