केंद्रात जाणार की महाराष्ट्रातच राहणार? फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर
केंद्रात जाणार की महाराष्ट्रातच राहणार? फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर
img
Nandini khandare More

सध्या राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत असून  मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, सध्या राजकारणात एका वेगळ्याच चर्चाना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार असल्याच्या चाचा दबक्या पावलांनी होत आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील, तर महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदारी मिळेल, असा दावा संजय राऊतांनी केलाय. देवेंद्र फडणवीसांची केंद्रात वर्णी लागल्यास मुख्यमंत्रि‍पदी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी, अशी इच्छा शिवसेनेचे नेते व्यक्त करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता या चर्चेवर खुद्द मुख्यमंत्री  फडणवीसांनीच पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी परवाच दिल्लीला गेलो होतो, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रात जाण्याची चर्चा फेटाळून लावली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी केंद्रीत मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चेवर उपरोधिक भाष्य केलं. तर कर्जमाफीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘काल सभागृहात सांगितले. यापूर्वीच्या कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीच्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं. पहिल्यांदा आपण हा निर्णय घेतला की, मागची कर्जमाफी होती. जी महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्जमाफी होती, त्यात ज्यांना माफी मिळाली होती. परंतु ते आता डिफॉल्टमध्ये गेले आहेत. त्यांना आधी 50 हजारापर्यंत रिलीफ देणार होतो. परंतु सत्तारुढ पक्षाचा आग्रह होता की, त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. आपण ते मान्य केले. ही महाराष्ट्रातील इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे’. तर कर्जमाफीचं शरद पवारांनी स्वागत केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आभार मानले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group