नाशिक-मुंबई महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली !
नाशिक-मुंबई महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली !
img
Nandini khandare More

सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान,  आता नाशिक-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या जुन्या कसारा घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात हिवाळा पाँईट जवळ काही प्रमाणात डोंगरावरून दरडीसह माती व दगड रस्त्यात पडल्याची घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्ध पातळीवर रस्त्यामधील दरडी हटवुन महामार्ग सुरळीत केला.

इगतपुरी तालुक्याला काल पासून रेड अलर्ट दिल्यामुळे व ढगफुटी होणार असल्याच्या माहितीमुळे प्रशासन अलर्ट मोडवर होते. त्यामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाने दरड हटवली असुन कसारा घाटातून वाहतुक संथ गतीने सुरळीत चालू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group