राजकारणात  आता काहीतरी   मोठं होणार ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? नक्की काय घडतंय ?
राजकारणात आता काहीतरी मोठं होणार ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? नक्की काय घडतंय ?
img
Nandini khandare More

उद्धव ठाकरे गटातील ६ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून राजकारणात मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळाले . दरम्यान आता पुन्हा एकदा राजकारणात मोठं काहीतरी घडणार असल्याची शक्यता आहे. 

कालच बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी अचानक दिसून आल्या. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात असून, अशातच शरद पवार गटही सत्तेत जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटही NDA मध्ये सामील होण्याची तयारी करत आहे. अलीकडील काही चर्चांनुसार सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यातील बैठकीत या विषयावरच विचार झाला असावा. ताज्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटात एका बड्या नेत्यावर याबाबतची जबाबदारी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व घडामोडी पाहता राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होईल की काय? असे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादीतील नेते काय प्रतिक्रिया देतील आणि काय निर्णय घेतील, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group