भाजप पक्षात मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडत आहेत . दरम्यान, आता भाजपने आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे, या नवीन कार्यकारिणीमध्ये पक्षाने विविध पदांवर महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत.याचदरम्यान आता शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चांनी जोर धरलाय. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील साऱ्या खासदाऱ्यांची बैठक बोलवलीय. त्यामुळे अनेक खासदारांची धडधड वाढली असून शिंदे कोणता मोठा निर्णय घेणार अशी चर्चा सुरू झालीय.
शिंदे गटाने राज्यात ऑपरेशन टायगर राबवत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फोडले. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. स्वतंत्र गट स्थापन केला. त्याचदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीकोनातून केंद्रात हालचाली सुरू आहेत.
ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांपैकी दोघांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळण्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय मंत्र्यानं केलेल्या विधानामुळे शिंदे गटातील नेत्यांची धडधड वाढलीय. सुरुवातील केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप आणि अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान मंत्रिमंडळाच्या चर्चेदरम्यान शिंदेंनी आपल्या सर्व खासदारांची नंदनवन येथे तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनातच हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात होते.
मात्र, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात हा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुंबईतील आजी माजी आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही महत्त्वपूर्ण बैठक आहे. आता या बैठकीकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता मोठा निर्णय होणार आहेत. पक्षांतर्गत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील भविष्यातल्या जेनझीं मतदारांवर लक्षात ठेवून त्याबद्दलच्या सूचना देण्यात येण्याची शक्यता आहे.