राज्यात ''या'' तारखेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा धोका ! मुख्यमंत्र्यांचा इशारा
राज्यात ''या'' तारखेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा धोका ! मुख्यमंत्र्यांचा इशारा
img
Nandini khandare More
सध्या राज्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. दरम्यान प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून हवामान विभागाकडून देखील वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आता थेट मुख्यमंत्र्यांनीच इशारा दिला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीलाही बसला असून, मुंबई महानगर प्रदेशात (MMR) अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करत येत्या 6 जुलैपर्यंत अपेक्षेपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून दर तीन तासांनी हवामानाचा आढावा घेत अलर्ट जारी केला जात आहे. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group