कुठलाच तांत्रिक बिघाड नाही; चक्क माकडाच्या हट्टामुळे रेल्वे वाहतूक ठप्प !
कुठलाच तांत्रिक बिघाड नाही; चक्क माकडाच्या हट्टामुळे रेल्वे वाहतूक ठप्प !
img
Nandini khandare More

अनेकदा  रेल्वे मार्गाचे काम अथवा काही तांत्रिक बिघाड झाल्यावरच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे आपण ऐकतो पण आज  बुधवारी मात्र सकाळी लोकल सेवा थोडा वेळ मंदावली ती एका माकडामुळे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा बुधवारी सकाळी काही काळ मंदावली होती ते ट्रॅकवरील माकडामुळे. त्याचा एका व्हिडीओही व्हायरल झाला असून सर्वत्र या माकडाचीच  चर्चा सुरू आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी बोरीवली रेल्वे स्थानकात अचानक एक माकड ट्रॅकजवळ येऊन बसलं. त्यामुळे ही लोकल सेवा काही काळासाठी मंदावली होती. ट्रॅकवरच्या माकडाला पहायला अनेक जण उत्सुक होते,  दरवाजा, खिडकीतून अनेक जण माकड उत्सुकतेने पाहत होते, काहींनी तर त्याची छबी मोबाईलमध्येही टिपली, काही प्रवाशांनी त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. मात्र थोड्या वेळाने हे माकडे ट्रॅकवरून निघून गेलं आणि त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत सुरू झाली.

मध्य रेल्वेचीही रखडपट्टी

दरम्यान पश्चिम रेल्वे काही काळ खोळंबलेली असतानाच, बुधवारी सकाळच्या सत्रात मध्य रेल्वेहीकाही काळ खोळंबली होती. सकाळच्या सत्रात बदलापूर-सीएसएमटी लोकल सेवेची रखडपट्टी झाली. मालगाडी थांबल्याने मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीनंतर लोकल वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र अनेक प्रवाशांना त्यामुळे त्रास सहन करावा लागला, काहींना कामावर पोहोचण्यासही उशीर झाला.लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कर्जतहून सीएसएमटी कडे जाणारी मालगाडी बराच वेळ बदलापूर स्थानकात थांबून राहिल्यामुळे लोकल सेवेचा बोजवारा उडाला. तांत्रिक बिघाडामुळे मालगाडी रखडल्याचं सांगण्यात येतय. 15 ते 20 मिनिटानंतर ही मालगाडी सीएसएमटीकडे रवाना झाली. मात्र यामुळे मुंबईकडे जाणारी लोकल वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र थोड्या वेळाने लोकल वाहतूक हळूहळू पूर्व पदावर आली.

ट्रान्स हार्बर रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने

तसेच ट्रान्स हार्बर रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे. नेरूळ रेल्वे स्थानक तांत्रिक बिघाड ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हर्बल लाईन रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे ठाणे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group